आज आपण ज्यांना भेटणार आहोत, ते चारही पाहुणे DNA या अमेरिकेत तयार झालेल्या मराठी चित्रपटाशी संबंधित आहेत. गेल्या दोन वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर आशय जावडेकर यांनी दिग्दर्शित केलेला हा पूर्ण लांबीचा (२ तास) चित्रपट आता अमेरिकेच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये २९ जून रोजी प्रदर्शित होतो आहे. नेहमीपेक्षा अगदी वेगळा विषय हाताळणाऱ्या या चित्रपटाशी संबंधित अनेक मंडळी अशा प्रकारचं काम पहिल्यांदाच करत आहेत. अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यापासून ते पश्चिम किनाऱ्यापर्यंत राहणाऱ्या या उत्साही मंडळींनी, आपापले पूर्ण वेळाचे व्यवसाय सांभाळत, त्यातून वेळ काढून ही निर्मिती केली आहे. आजच्या एपिसोडमध्ये ऐकणार आहोत टीम DNA बरोबर झालेल्या गप्पा.
“विश्वसंवाद”चा हा एपिसोड तुम्ही इथंही ऐकू शकाल:
Leave a Reply