Innovation हे फक्त तंत्रज्ञानाच्या किंवा कॉपोरेट क्षेत्रातच दिसतं असं नाही. पण हायस्कूलमधल्या मुलांना गणित शिकविण्यातही काही innovation आणता येतं यावर कदाचित आपला पटकन विश्वास बसणार नाही. महाराष्ट्रातल्या उस्मानाबाद जिल्ह्यातल्या सुकटा या अगदी छोट्याश्या गावात असं innovation घडतंय.
या खेड्यातले गणिताचे शिक्षक प्रकाश यादगिरे यांनी “एक गाव गणिताचा” या नावाचा एक अभिनव प्रयोग गेले काही महिने चालविला आहे. मुलांच्या मनातली गणिताची भीती नाहीशी व्हावी या कळकळीतून यादगिरे सर यांनी हा आणि इतर काही काही अफलातून प्रयोग केलेत. आणि ते ही स्वत:च्या खिशातले पैसे खर्च करून. आपल्या स्वतःच्या परिघातच काही वेगळा विचार करून तो प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न थक्क करून सोडणारे आणि तितकेच प्रेरणादायीही आहेत.
आजच्या एपिसोडमध्ये आपण प्रकाश यादगिरे सरांकडूनच ऐकणार आहोत त्यांच्या या आगळ्या-वेगळ्या प्रयोगाबद्दल. यांच्याकडून त्याबद्दल ऐकणार आहोत.
“विश्वसंवाद”चा हा एपिसोड तुम्ही इथंही ऐकू शकाल:
https://vishwasamwaad.podbean.com/mf/play/tynez7/vs-35-PrakashY-Full-Final.mp3
Leave a Reply