विश्वसंवादच्या ३०व्या एपिसोडमध्ये तुमचं स्वागत. या एपिसोडमध्ये श्रीनिवास नार्वेकर या पाहुण्यांची मुलाखत घेणार आहेत अतिथी संवादक हेमांगी वाडेकर. त्याबद्दल मनःपूर्वक आभार.
लेखक, दिग्दर्शक, अभिनेता, कॉपी-रायटर म्हणून प्रसिद्ध असणारे श्रीनिवास नार्वेकर यांची खास ओळख आहे ती आवाज- साधना म्हणजेच व्हॉइस कल्चर या विषयातले तज्ज्ञ म्हणून. सर्वसामान्य माणसांपासून ते अभिनेते आणि राजकारणी मंडळींपर्यंत प्रत्येकाला या कार्यशाळांचा फायदा झालेला आहे. शिवाय “चला वाचू या” या नावाचा अभिवाचनाचा महत्त्वपूर्ण उपक्रमही ते चालवतात. त्याचा २५वा कार्यक्रम नुकताच पार पडला. एका आगळ्या-वेगळ्या क्षेत्रात स्वतःचं स्थान निर्माण करणाऱ्या श्रीनिवास नार्वेकरांच्या मुलाखतीचा हा पहिला भाग.
“विश्वसंवाद”चा हा एपिसोड तुम्ही इथंही ऐकू शकाल:
https://vishwasamwaad.podbean.com/mf/play/dy3npx/vs-30-ShriniwasN-1-full-Final.mp3
Leave a Reply