नागपूरचे अतुल आणि प्राजक्ता हे दाम्पत्य खरं तर एक सॉफ्टवेअर कंपनी चालवितात. पण त्यापेक्षाही महत्त्वाचं एक दुसरं काम ते शांतपणे, कोणताही गाजावाजा ना करता आणि अगदी निरलस भावनेनं करीत आहेत. अनेक समाजसेवी संस्थाना ते आर्थिक मदत आणि व्यवस्थापकीय सल्ला पुरवितात. तसंच, काही वेगळं, समाजोपयोगी काम करून इच्छिणाऱ्या तरुण-तरुणीनाही ते अशीच मदत करतात. त्यांच्या सुरुवातीच्या काळात चांगलं काम करण्याची उमेद, उत्साह पैशांअभावी मावळून जाऊ नये अशा भावनेनं या तरुण मंडळींना ते काही वर्षांकरता दार महिन्याला ठराविक रक्कम फेलोशिप म्हणून देतात. यातला महत्त्वाचा भाग हा, की हे सगळं काम ते इन्व्हेस्टर म्हणून करत नाहीत तर आपल्याकडून चांगल्या कामाला मदत व्हावी एवढाच त्यांचा उद्देश असतो. ज्याला “एंजल मेन्टॉरिंग” म्हणता येईल, अशा त्यांच्या कामाबद्दल त्यांच्याशी झालेल्या या गप्पा.
“विश्वसंवाद”चा हा एपिसोड तुम्ही इथंही ऐकू शकाल:
https://vishwasamwaad.podbean.com/mf/play/pauqqg/vs-48-PrajaktaAtul-full-final.mp3
Leave a Reply