आजच्या पाहुण्या आहेत वीणा गोखले. “देणे समाजाचे” या नावाचा उपक्रम गेल्या दहा वर्षांहून अधिक काळ त्या चालवत आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या समाजसेवी संस्थाना एकत्र आणून त्यांचं काम जगासमोर आणावं हा यामागचा उद्देश आहे. पुण्यात एका मध्यवर्ती ठिकाणी एक मोठा हॉल घेऊन तिथे या सर्व संस्थांचे स्टॉल्स लावले जातात. प्रदर्शनाला भेट देणारी मंडळी या संस्थांचं काम समजून घेऊन योग्य वाटेल त्या संस्थाना देणगी देतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वीणा गोखले यांची संस्था यासाठी कोणतीही फी आकारात नाही. इतकी वर्षं पुण्यात हा उपक्रम चालविल्यानंतर या वर्षी त्यांनी मुंबईतही हे प्रदर्शन भरवलं होतं आणि त्यालाही भरपूर प्रतिसाद मिळाला.
वीणाताईंचा मूळ व्यवसाय आहे पर्यटनाचा पण तो ही अगदी वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीचा. या साऱ्याबद्दल आपण त्यांच्याकडून ऐकणार आहोत.
“विश्वसंवाद”चा हा एपिसोड तुम्ही इथंही ऐकू शकाल:
https://vishwasamwaad.podbean.com/mf/play/2du8ts/vs-43_VeenaG-Full-Final.mp3
Leave a Reply