आजचे पाहुणे आहेत दत्ता पाटील. याहू या कंपनीमध्ये Director असणारे दत्ता हे मूळचे हलगरा या गावाचे. महाराष्ट्रातल्या लातूर जवळच्या एका खेड्यातले. २०१६ मध्ये दुष्काळी परिस्थितीमुळे या गावात पिण्याचं पाणी विकत घेण्याचा प्रसंग त्यांच्यावर आला पण त्यामुळे त्या गावाचं नशीबच बदलून गेलं असं म्हणायला हवं. कारण गेल्या अडीच वर्षात, दत्ता पाटील यांच्या पुढाकारामुळे आणि गावातल्या मंडळींच्या सहकार्यातून या गावात आता २०० कोटी लिटर पाणी साठवण्याची क्षमता निर्माण झाली आहे. याचबरोबर रस्ते, स्वच्छतागृहं अशी अनेक कामही तिथं घडताहेत. “स्वच्छ सुंदर हलगरा” असं घोषवाक्य असणारं या गावाचं फेसबुक पेज जरूर पाहण्याजोगं आहे. “स्वदेस” या चित्रपटासारखीच पण प्रत्यक्षात घडलेली गोष्ट सांगत आहेत दत्ता पाटील.
हलगरा या गावाचं फेसबुक पेज: https://www.facebook.com/halgaravillage/
Overseas Volunteers for Better India: https://www.overseasvbi.org/
दत्ता पाटील यांचा ई-मेल: dattap@yahoo.com
“विश्वसंवाद”चा हा एपिसोड तुम्ही इथंही ऐकू शकाल:
https://vishwasamwaad.podbean.com/mf/play/fbrx2m/vs-37-DattaP-Full-Final.mp3
Leave a Reply