नमस्कार! विश्वसंवाद या मराठी पॉडकास्टच्या जगभरातल्या श्रोत्यांचं आजच्या २९ व्या एपिसोडमध्ये स्वागत. एक आनंदाची बातमी. तुमच्या भरघोस प्रतिसादातून आता विश्वसंवादचे डाउनलोडस ५०००च्याही वर गेले आहेत. या प्रसंगी तुम्हा सर्वांचे मनापासून आभार.
शेकडो वर्षांपूर्वी लिहिली गेलेली हस्तलिखितं आणि पोथ्या या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून डिजिटाईझ करण्याचं फार मोठं काम नाशिक इथं राहणारे डॉ. दिनेश वैद्य गेल्या वीस वर्षांपासून करत आहेत. आजवर त्यांनी डिजिटाईझ केलेल्या पानांची संख्या आता १० लाखांच्या जवळ पोचली आहे. लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसनं या कामाची दाखल घेतली आहे. आजच्या एपिसोडमध्ये डॉ. दिनेश वैद्य सांगत आहेत त्यांच्या या उपक्रमाबद्दल.
“विश्वसंवाद”चा हा एपिसोड तुम्ही इथंही ऐकू शकाल:
https://vishwasamwaad.podbean.com/mf/play/k6bnk9/vs-29-DineshV-Full-Final.mp3
Leave a Reply