नमस्कार!! “विश्वसंवाद”च्या सर्व श्रोत्यांना २०१८ या नव्या वर्षाच्या अनेकानेक शुभेच्छा.
हा आहे आमचा २५वा एपिसोड आणि या एपिसोडसह “विश्वसंवाद” या मराठीतल्या पहिल्या पॉडकास्टचं दुसरं वर्ष सुरु होतं आहे, याचा आम्हाला खूप आनंद वाटतोय. आमच्या सगळ्या श्रोत्यांना मनःपूर्वक धन्यवाद.
कॉलेज ऑफ इंजिनीरिंग पुणे म्हणजेच सी ओ ई पी हे १८५४ साली सुरु झालेलं पुण्यातलं नामवंत इंजिनीरिंग कॉलेज. २००९ ते २०१६ या काळात या कॉलेजमधल्या १७६ विद्यार्थ्यानी एक आगळा वेगळा प्रोजेक्ट पूर्ण केला. संपूर्णपणे फक्त विद्यार्थ्यानी ज्याचं डिझाईन आणि निर्मिती केली असा स्वयम या नावाचा उपग्रह. हॅम रेडिओसाठी लागणार कम्युनिकेशन करणारा हा स्टुडन्ट सॅटेलाईट जून २०१६ मध्ये अवकाशात यशस्वीपणे सोडला गेला.
या प्रोजेक्टमध्ये अगदी संकल्पनेपासून सहभागी असणारा अभिषेक बाविस्कर आणि या प्रोजेक्टला मार्गदर्शन करणाऱ्या प्राध्यापिका मनीषा खळदकर हे आजचे आपले पाहुणे आहेत. त्यांच्याकडूनच ऐकू या स्वयमच्या निर्मितीची कहाणी.
“विश्वसंवाद”चा हा एपिसोड तुम्ही इथंही ऐकू शकाल:
https://vishwasamwaad.podbean.com/mf/play/vc9rse/vs-25-Swayam-full-Final.mp3
Leave a Reply