“विश्वसंवाद” या मराठी पॉडकास्टच्या २४ व्या एपिसोडमध्ये तुमचं स्वागत. या वर्षी १ जानेवारीला सुरु झालेल्या या मराठीतल्या पहिल्या पॉडकास्टला एक वर्ष पूर्ण होतंय. संपूर्ण जगभरातल्या जवळजवळ ४००० श्रोत्यांनी आजवर हा पॉडकास्ट डाऊनलोड केलाय आणि ५०००चा टप्पा लवकरच गाठण्याकडे आमची वाटचाल सुरु आहे. यानिमित्तानं आमच्या सगळ्या श्रोत्यांचे आणि भरभरून प्रतिसाद देणाऱ्या चाहत्यांचे मनापासून आभार. तुम्हां सर्वाना नवीन वर्षाच्या अनेकानेक शुभेच्छा!
मागच्या एपिसोडमध्ये सायली राजाध्यक्ष यांच्याशी झालेल्या गप्पांना तुमचा खूप छान प्रतिसाद मिळालाय, त्याबद्दल आभार. त्यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग या एपिसोडमध्ये सादर करीत आहोत. मराठी ब्लॉग्ज लिहिण्याबरोबरच सायली यांनी चालविलेला दुसरा महत्त्वाचा उपक्रम म्हणजे “डिजिटल दिवाळी: एक नेट-का अंक” हा ऑनलाईन मल्टिमिडीया दिवाळी अंक. आजच्या एपिसोडमध्ये ह्या उपक्रमाबद्दल सांगाताहेत सायली राजाध्यक्ष.
मंडळी, गेलं वर्षभर विश्वसंवाद या मराठी पॉडकास्टचे एपिसोडस तुम्ही ऐकत आहात. फेसबुक आणि इमेल्स मधून मिळालेला तुमचा प्रतिसाद हा खूपच उत्साह वाढवणारा आहे. नवीन वर्षाची भेट म्हणून तुमच्या मित्रमंडळींना “विश्वसंवाद”ची ओळख जरून करून द्या, त्यांना ही अभिनव भेट नक्की आवडेल. नव्या वर्षाचं स्वागत करीत, या पुढचा २५ वा एपिसोड घेऊन १ जानेवारीला आपण पुन्हा भेटणार आहोत, तेव्हा ऐकत राहा, ऐकवत राहा “विश्वसंवाद”.
“विश्वसंवाद”चा हा एपिसोड तुम्ही इथंही ऐकू शकाल:
https://vishwasamwaad.podbean.com/mf/play/33ruph/vs-24-SayaliR2-full-Final.mp3
Leave a Reply