जगातलं सर्वात मोठे शब्द-कोडं बनविण्याचा विश्व-विक्रम ज्यांच्या नावावर आहे ते मिलिंद शिंत्रे आजचे पाहुणे आहेत. हे शब्द-कोडं बनलंय ते एक लाख तेहेतीस हजार चौकटींचं आणि त्यात त्रेचाळीस हजारहून जास्त शब्द आहेत. या विक्रमाच्या मागे असलेली प्रेरणा, ते कसं तयार केलं गेलं, ते करताना आलेले अनुभव आणि अडचणी या सगळ्याबद्दल सांगताहेत मिलिंद शिंत्रे.
